सरपंच राजा प्रभू यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
स्वप्निल कदम l कुडाळ : वालावल गावच्या उपसरपंच पदी पूर्वा प्रवीण आडेकर यांची बिनविरोध निवड झाली नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुडाळ तालुक्यातील वालावल ग्रामपंचायत संपूर्ण टीम सहित सरपंच राजा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाचा झेंडा फडकविण्यात यश आले आहे गावच्या एकूण दहा सदस्याने आज पदभार हाती घेतला आहे यावेळी सरपंच राजा प्रभू यांनी उपसरपंच पूर्वा आडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी निवडणूक अधिकारी प्रफुल्लवालावलकर प्रशासक ओरस्कर ग्रामसेवक श्री शेगडे भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर माजी पसा सदस्य संदेश नाईक माझी पसा सदस्य करिष्मा टेमकर कृष्णा टेमकर एस सी मोर्चा भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर मनीष वंजारे अक्षय वालावलकर नितीन आडेकर संजय केरकर प्रवीण आडेकर राधाकृष्ण मटकर राजा वालावलकर आनंद चौधरी ललित कुमार प्रभू प्रसाद प्रभू संतोष गवंडे विलास वालावलकर तसेच बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आलेले अनंत वालावलकर नूतन ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गोवेकर जनार्दन बंगे शुभदा कुंडेकर यशश्री वालावलकर साक्षी कवठणकर अनंत वालावलकर प्राची हळदणकर मनोज पाटकर तसेच मोठ्या संख्येने वाला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नूतन सरपंच राजा प्रभू यांनी उपसरपंच पूर्वा आडेकर याचे स्वागत व अभिनंदन केले.
वालावल गाव हेच माझे कुटुंब सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास केला जाईल -राजा प्रभू
माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी खासदार निलेश राणे तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यापुढे देखील गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सरपंच राजा प्रभू यांनी सांगितले संपूर्ण वालावल गाव हेच माझे कुटुंब आहे गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावच्या हिताचे निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतले जातील मी व माझ्या सहकाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थकी लावीन माझ्या यशामध्ये प्रत्येक ग्रामस्थाचे योगदान आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे असे मत यावेळी सरपंच राजा प्रभू यांनी व्यक्त केले
फोटो वालावल ग्रामस्थांच्या सरपंच राजा प्रभू यांचा सत्कार करताना उपस्थित ग्रामस्थ
फोटो उपसरपंच पूर्वा आडेकर यांचे अभिनंदन करताना सरपंच व उपस्थित ग्रामस्थ (छाया- स्वप्नील कदम)











