वैभववाडीत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी l प्रतिनिधी :    वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ११ वा. प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात येणार आहे. या वाचनामध्ये अ.रा.विदयालय वैभववाडी या विदयालयाचे विदयार्थ्यांसह नागरीक  सहभागी होणार आहेत. तर भारतीय संविधान या विषयावर प्रफुल्ल जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संघनेचे ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव व सरचिटणीस रविंद्र पवार यांनी केले आहे.