चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचा उपक्रम
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती व संस्थेच्या शिक्षण समितीच्या वतीने विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चिपळुणातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात, प्रांत ऑफिस शेजारी, तालुकास्तरीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्व स्पर्धा- २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धा दोन गटात घेतली जाणार असून माध्यमिक गट अ (इयत्ता आठवी ते दहावी ) त्याकरिता बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक लोकशाही, संविधान व लोकशाही खरेच धोक्यात आली आहे का?, जातीविहीन समाज निर्मितीमध्ये आपले योगदान! हे तीन विषय देण्यात आले असून या गटासाठी भाषणाची वेळ पाच मिनिटांची असणार आहे. तर गट ब महाविद्यालयीन गटासाठी (अकरावी ते पदवी पदव्युत्तर पदविका) विद्यार्थ्यांसाठी विषय आरक्षण धोरण: वस्तुस्थिती आणि विपर्यास!, संविधानाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाष्य खरे ठरत आहे काय?, देशातील सामाजिक- राजकीय सौहार्द का बिघडू लागलाय? असे विषय ठेवण्यात आले आहेत. या गटासाठी वेळ सात मिनिटांचे असणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना माध्यमिक गटासाठी प्रथम क्रमांक ७०० रुपये,
द्वितीय क्रमांक ६०० रुपये, तृतीय क्रमांक ५०० रुपये व उत्तेजनार्थ ३०० रुपये आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असणार आहे. तसेच महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी रुपये १०००, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ८००, तृतीय क्रमांकासाठी रुपये ६०० व उत्तेजनार्थ रुपये ३०० आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत एका शाळेमधून अथवा महाविद्यालयांमधून प्रत्येक गटातून जास्तीत जास्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी नाव नोंदणी १ डिसेंबरपर्यंत शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार (७०६६०७८७५८), संस्थेचे चिटणीस सुहास पवार (९६८९५८२८३२) या व्हाट्सअप नंबरवर तथा फोनद्वारे करण्यात यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.










