शृंगारतळी येथे आज जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या नव्या कोऱ्या जादू

गुहागर | प्रतिनिधी : होम मिनिस्टर, सुर नवा ध्यास नवा ,कॉमेडी एक्सप्रेस , ABP माझा कट्टा, खाली डोकं वर पाय,आम्ही सारे खवय्ये , खुपते तिथे गुप्ते आणि नुकत्याच चला हवा येऊ द्या वर गाजलेल्या जादू आणि परदेशातून आणलेले खास नवीन जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी तब्बल दहा वर्षांनंतर शृंगारतळी येथे जादू प्रेमी रसिकांसाठी उपलब्ध झाली आहे.

जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे मायाजाल आज शनिवार २५ नोव्हेंबर सायं ७.०० वाजता ओंकार मंगल कार्यालय, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आले आहेत.नुकतेच युरोप, अमेरिका, सिंगापूर आणि गोवा, सिंधुदुर्ग, चिपळूण, पुणे, पनवेल, सांगली, कोल्हापूर,औरंगाबाद,बीड, कल्याण, डोंबिवली, कराड, इस्लामपूर,तासगाव, अकलूज, विटा,पलूस, सातारा, मिरज, रत्नागिरी,बेळगाव,रायगड, नाशिक, सिन्नर, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव आणि जळगाव मधील हाऊसफुल्ल शोज नंतर सर्व बालगोपाल ,आई-वडील आणि आजी-आजोबा ह्यांना १००% मनोरंजनाची संधी ह्या निमित्ताने सर्वांना उपलब्ध होणार आहे. जादूगार रघुवीर-विजय-जितेंद्र रघुवीर पिता-पुत्रांचा हा विक्रमी १५९४५ वा प्रयोग आहेत.

आजोबा कै.जादूगार रघुवीर ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त अनेक नवीन प्रयोग जपान ची ३ भुते, बॉक्स ऑफ मोगली, हाऊस ऑफ मायाजाल,गिफ्ट बॉक्स आणि जितेंद्र रघुवीर ह्यांची स्पेशल जादू ह्या वेळेस रसिकांना अनुभवयास मिळणार आहेत.

गेल्या ३ महिन्यापूर्वीच जादूगार जितेंद्र रघुवीर *युरोप* मध्ये तर गेल्या वर्षी *अमेरिकेत आणि सिंगापूर* यशस्वी दौरा करून आले..तिथून आणलेल्या नवीन जादू पण ह्या निमित्ताने अनुभवता येतील. *तब्बल १० वर्षाच्या गॅप नंतर शृंगारतळी* येथे जादूगार रघुवीर हा सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करू शकणारा शो होत आहे.जादू प्रेमींनी आपले आसन लवकरच बुक करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आहे. विद्यार्थ्यांना तिकिटावर रु १०० ची खास सवलत देण्यात आली असून अधिक माहितीसाठी 9922751643,976742718, 8412038108 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.