भ्रष्ट ग्रा.पं.पदाधिकारी,अधिकारी आणि उद्दाम ठेकेदाराला पाठीशी घालून वाचविण्याचे पं.स.अधिकाऱ्यांचे प्रयत्न!!
आमरण उपोषण होणारच! ग्रा. पं.सदस्य मिनार पाटील यांचा निर्धार!
पालशेत | वार्ताहर : सध्या गुहागर तालुक्यात गाजत असलेल्या पाल शेत येथील शौचालय दुरुस्ती कामाच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गटविकास अधिकारी,पंचायत समिती,गुहागर ,उप अभियंता, जि. प.बांधकाम उप विभाग पं. स.गुहागर,शाखा अभियंता,यांनी ग्रामसेवक,ग्रामपंचायत,पालशेत,सरपंच,पालशेत व सदस्य,ग्रामस्थांसह या कामांची केलेली प्रत्यक्ष पाहाणी हा केवळ एक फार्स होता.भ्रष्ट ग्रा.पं.पदाधिकारी,अधिकारी आणि उद्दम ठेकेदाराला पाठीशी घाऊन वाचविण्याचाच हा अक्षम्य प्रयत्न आहे.अशा या भ्रष्ट कारभारविरोधात २जानेवारीला आमरण उपोषण हे होणारच असा निर्धार ग्रा.पं.सदस्य मिनार पाटील यांनी याबाबत बोलताना व्यक्त केला आहे.
उप अभियंता जी.प.बांधकाम उप विभाग,गुहागर यांचे दि.२९/१२/२०२२ चे उपोषण मागे घेण्याबाबत चे पत्र मिनार पाटील यांना ३०डिसेंबर रोजी प्राप्त झाले आहे.त्याच प्रमाणे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गुहागर यांचेही याबाबतचे पत्र मिनार पाटील यांना प्राप्त झाले आहे.मा.तहसीलदार कार्यालय,गुहागर आणि पोलीस ठाणे,गुहागर यांना माहितीसाठी पाठविण्यात आलेल्या पत्राची तारीख ३०/१२/२०२२ अशी आहे.मात्र तालुक्याच्या अत्यंत महत्त्वाच्या य दोन कार्यालयांनी पत्र प्राप्तीची पोहोच २९/१२/२०२२ रोजी दिली आहे.पंचायत समिती अधिकाऱ्यांनी २९ डिसेंबर रोजी च ३०डिसेंबर रोजी केलेल्या संबंधित शौचालय दुरुस्ती कामांच्या घोटाळ्याच्या आलेल्या तक्रारीनुसार केलेली पाहणी ही पं. स. च्या जबाबदार अधिकारी वर्गाने पालशेतचे सरपंच,ग्रामसेवक,सदस्य व ग्रामस्थांसह केल्याचा उल्लेख केला आहे.
ही मखलाशी करून अधिकाऱ्यांनी ते भ्रष्टाचाराबाबत किती बेफिकीर आहेत आणि त्यांचा भ्रष्ट ग्रा. पं.पदाधिकारी,संबंधित अधिकारी आणि उद्दाम ठेकेदाराला यातून वाचविण्यासाठी पध्दतशीरपणे पूर्वनियोजित प्रयत्न असल्याचे दाखऊन दिले आहे.या कामांच्या पाहणीवेळी उपस्थित तक्रारदार आणि ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या कामातील त्रुटी /चुका दाखऊन दिल्यानंतर, तक्रार असतानाही,कामाचे अंतिम उल्यांकन झालेले असतानाही भ्रष्ट पदाधिकारी,अधिकारी सदर कामातील बदल हे करता येतील असे बेजबाबदार उत्तर देतात.यातच सगळे आले.शौचालायचे पत्र्याचे काम जुनेच असल्याचे शाळेच्या शिक्षिका आणि ग्रामस्थ सांगत असताना ठेकेदाराचीच बाजू उचलून धरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हेतूबद्दलच शंका निर्माण होते.
विशेष म्हणजे तक्रारदार मिनार पाटील यांनी केलेली प्रत्यक्ष पाहणी आणि त्याचा जागेवरच अहवाल करावा या मागणीला धुडकावत चौकशी/ पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ते आम्ही नंतर करू असे सांगत काढता पाय घेतल्याचे मिनार पाटील यांनी सांगितले.खरेतर वस्तुनिष्ठ चौकशी/पाहाणी होणे अपेक्षित होते.जागेवर तक्रारींचे निवारण होणे आवश्यक होते.पाहणी अहवालावर तक्रारदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विश्वासार्हता जपणे आवश्यक होते मात्र अधिकाऱ्यांनी त्यांचा मनसुबा त्यांच्या कृतीतून दाखऊन दिला.तक्रारदार मिनार पाटील यांना पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये गटविकास अधिकारी आणि उप अभियंता यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे तसे न केल्यास होणाऱ्या परिणामांना आपणच जबाबदार राहाल असे कळविले आहे.मात्र अधिकाऱ्यांनी भ्रष्ट पदाधिकारी,अधिकारी,आणि ठेकेदार यांना पाठीशी घालण्याचे चालविलेले हे अक्षम्य प्रयत्न आणि भ्रष्टाचारी वृत्ती चा निषेध म्हणून कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत २डिसेंबरला आमरण उपोषण होणारच असा निर्धार व्यक्त केला आहे.










