चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुका महिला काँग्रेस व शिवआरोग्य सेना रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शहरातील कावितळी परिसरात आकाश निवास येथे हे शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा चिपळूण शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, नेत्रतज्ज्ञ डॉ. अयुब दरवाजकर, शिवआरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत चव्हाण, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले व्यासपीठावर होते. डॉ. शशिकांत चव्हाण यांनी यावेळी शिबिरातील सुविधांची माहिती दिली. लियाकत शाह, जनार्दन पवार आणि सुरेश राऊत यांनी चिपळूण तालुका महिला काँग्रेसच्या उपक्रमाचे कौतुक करून शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, चिपळूण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निर्मला जाधव, उपाध्यक्ष वर्षा खटके, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्रद्धा कदम, शहर उपाध्यक्ष विणा जावकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, मुन्ना दळी, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, नईम खाटीक, समीर कडवईकर, प्राजक्ता सरफरे, सचिन गायकवाड, तुकाराम डबाले, चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज आदी उपस्थित होते. यावेळी महिला काँग्रेसच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.












