Malvan | सुवर्णकडा येथून युवक समुद्रात पडला

स्थानिकांनी वाचवले: युवक गंभीर जखमी :अधिक उपचार सुरु 

मालवण | प्रतिनिधी : कोळंब सर्जेकोट मार्ग येथील सुवर्णकडा येथे व्हिडिओ शुटिंग करण्यास गेलेला एक युवक कड्या वरून समुद्रात खडकात पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्याला स्थानिकांनी वाचवले. गंभीर जखमी स्थितीतील या युवकाला ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.

 

सेंटरिंग करणारे काही युवक (मूळ रा. पश्चिम बंगाल) हे फिरण्यासाठी व फोटो व्हिडिओ काढण्यासाठी सर्जेकोट येथे आले होते यावेळी अपघात घडला. बदल हा युवक पडून जखमी झाला. कोळंब गावातील संतोष शेलटकर आणि प्रेमानंद पराडकरया तरुणांनी छोटी होडी घेऊन त्याला वाचवलं. तरुणावर अधिक उपचार सुरु आहेत.