अलोरे ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समिती आयोजित संविधान सन्मान रॅली

चिपळूण (प्रतिनिधी) : संविधान दिनाचे औचित्य साधून अलोरे ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समिती आयोजित संविधान सन्मान रॅली अलोरे ग्रामपंचायतमधून गावामध्ये काढण्यात आली. समता बंधुता लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही, संविधानाने दिला मान स्त्री-पुरुष एकसमान अशा घोषणा देत, संविधान आणि डॉ बाबासाहेबांचा,छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत घोषणा देत शिस्तबद्ध पद्धतीने रॅली काढण्यात आली.

यामध्ये सविधांनप्रेमींनी मोठया प्रमाणात भाग घेतला. रॅलीनंतर संविधान प्रास्ताविक म्हणण्यात आले. आणि गावातील छोट्या मुलांनी स्वरा चिपळूणकर, संबोधी जाधव, रुद्राक्षी कररा भाषणे केली, मान्यवर विजय वानखडे, व्हाईस प्रिन्सिपल ITI चिपळूण यांचे मुख्य मार्गदर्शन झाले. यावेळी विशेष म्हणजे संसदेतील हस्तलिखित संविधान (हिंदी) मूळ सत्यप्रत पुस्तक पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले.

यावेळी सरपंच अंजली मोहिते, उपसरपंच प्रमोद महाजन, सदस्या मानसी चव्हाण, सदस्य तुषार चव्हाण, निलेश चावरे, मनीष गांगण, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत चिपळूणकर, सदस्य व्यंकटेश कररा, अनंत जाधव, ग्राविकास अधिकारी अमर आयवळे, पोलीस पाटील चेतन सावंत, महसूल विभागचे शंकर चिपळूणकर, जेष्ठ व्यक्तमत्व प्रकाश आंब्रे, बळवंत चिपळूणकर, राजन जाधव, अनिल मोहिते, नेत्रा पाटील, जितेंद्र कांबळे, दीपक जाधव, इकबाल चिपळूणकर, विठ्ठल पेढांबकर, संदीप चिपळूणकर, पी. के. देवरुखकर, किरण कदम, बबन मोहिते, नवनीत मोहिते, माधवी जाधव, रेश्मा जाधव, संगीता मोहिते, आश्विनी मोहिते, गीता चिपळूणकर, दीपक मोहिते, शिक्षक दीपक खाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वसंत चिपळूणकर यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संविधान प्रेमींनी समाधान व्यक्त केले.