जिल्हा स्तरीय गीत गायन स्पर्धेसाठी कुणाची निवड झाली..जाणून घ्या..

मा.पं.शि.प्र.मंडळ माखजन ची गायन स्पर्धा

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन च्या कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षा मार्फत जिल्हा स्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची निवड फेरी नुकतीच रत्नागिरी,दापोली,माखजन या ठिकाणी झाली.रत्नागिरी येथील निवडफेरी ही लांजा,राजापूर,रत्नागिरी तालुक्यांसाठी होती.या निवड फेरीत लहान गटातून ऋग्वेद तेरेदेसाई (जी.जी.पी.एस.हायस्कूल,रत्नागिरी),दिया परब (रा.भा.शिर्के हायस्कूल रत्नागिरी),मीरा कामतेकर (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी) आदी तर मोठ्या गटातून अर्णव सरपोतदार(दामले विद्यालय रत्नागिरी),सार्था गवाणकर (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी),स्वरा भागवत (पोतदार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी),आदित्य लिमये(फाटक हायस्कूल रत्नागिरी)आदी स्पर्धकांची तर दापोली,मंडणगड,खेड तालुक्यांसाठी झालेल्या दापोली केंद्रावर लहान गटात अन्वी क्षीरसागर (सरस्वती विद्यामंदिर दापोली)आकृती केळकर(सरस्वती विद्यामंदिर दापोली),मुक्ता आंबेकर(ए जी हायस्कूल जालगाव,सानवी कासारे (सरस्वती विद्यामंदिर दापोली) तर मोठ्या गटातून शर्वरी गिम्हवणेकर(सरस्वती विद्यामंदिर दापोली),स्पंदन मोरे(ज्ञानदीप विद्यामंदिर), आदींची निवड झाली.
तर गुहागर,चिपळूण,संगमेश्वर या तालुक्यासाठी माखजन केंद्रावर झालेल्या निवड फेरीत लहान गटातून अनुश्री भागवत (युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण ),कार्तिक सप्रे(दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी)स्वराज पाटील(न्यू इंग्लिश स्कूल सती)अनन्या खेराडे (जि.प.केंद्र शाळा आबिटगाव नं.१)प्रांजल सुरवसे(प्रेमाजी भाई आसर विद्यालय चिपळूण)तर मोठया गटात गिरीराज लिंगायत(पैसाफंड इंग्लिश स्कूल )सुरभी चितळे(युनायटेड इंग्लिश स्कूल),समीक्षा कुंभार(माखजन इंग्लिश स्कूल)स्वरा यादव (मेरी माता इंग्लिश स्कूल)आर्या पोटे(मेरी माता इंग्लिश स्कूल)सृष्टी तांबे (गोविंदरावं निकम माध्यमिक हायस्कूल सावर्डे) रिया जाधव(न्यू इंग्लिश स्कूल पोफळी) आदी स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली आहे.उपांत्य फेरी २४ डिसेंबर ला होणार असून अंतिम स्पर्धा २५ डिसेंबर ला होणार आहे.

तिन्ही केंद्रावर मिळून,निवड फेरीला सुमारे २०० स्पर्धकांनी हजेरी लावली.या निवड फेरी चे परीक्षण जान्हवी खडपकर,सायली मुळे,विशारद गुरव,दीपक पोंक्षे आदिनी केले.निवड फेरीला जिल्ह्यातून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी आभार मानले आहेत.