रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील एनसीसी विद्यार्थ्यांनी ही अनुभवला थरार
मालवण | प्रतिनिधी : तारकर्ली समुद्रात भारतीय नौदलाच्या चित्तथरारक कवायतींचा थरार याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय गुरुवारी तारकर्ली किनारपट्टी येथे एकवटला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील सुमारे 900 एनसीसी विद्यार्थ्यांनीही कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवाला.
नौसेना दिन सोहळा निमित्त तारकर्ली समुद्रात दाखल झालेल्या युद्धनौका, लढाऊ विमाने, नौदलाच्या मरीन कमांडोंनी समुद्रात आपल्या कसरतिंचा सराव तिसऱ्या दिवशी केला. या सरावात नेव्हीची लढाउ विमाने, युद्ध नौका, छोट्या बोटी, हेलिकॅप्टर सामील झाली होती. एम एस आर, ए एल एच, कामोध ३१, सी किंग, चार्ली आदी हेलिकॅप्टरनी विविध प्रत्यक्षिके केली.
तारकर्ली येथील नौदलाच्या या कवायतींचा लेफ्टनंट प्राध्यापक एम. आर. खोत यांच्या संघटनातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील एकूण 900 एनसीसी विद्यार्थ्यांनी पाहण्याचा लाभ घेतला. यात 200 नेवल तर 700 आर्मी एनसीसी विध्यार्थी सहभागी होते. सर्वजण नौसेनेच्या कसरती पाहून आंनदीत झाले. नेवी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या सहकार्यतून एनसीसी विध्यार्थ्यानी हा अनुभव घेतला. असे प्रा. एम. आर. खोत यांनी सांगित आभार मानले.
4 डिसेंबर रोजी होणाऱ्या नौसेना दिन निमित्त जी प्रत्यक्षिके सादर होणार आहेत त्याचा सराव किनारपट्टी येथे सुरु आहे. 3 डिसेंबर रोजी रंगीत तालीम होणार आहे. तर 4 डिसेंबर रोजी मुख्य सोहळा डोळ्यांचे पारणें फेडणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












