रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील करबुडे येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करताना खाली पडून गंभिर जखमी झालेल्या कामगाराच उपचारांदरम्यान मुंबईत मृत्यू झाला.याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुर्यकांत रामचंद्र रामबाडे (40,रा.वेतोशी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.सोमवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वा.ते करबुडे येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करत होते.तेव्हा 20 फूट अंतरावरुन खाली पडल्याने त्यांच्या हनुवटील,दोन्ही पायांना,दोन्ही हातांना खरचटून गंभिर दुखापत झाली होती.त्यांना अधिक उपचारांसाठी कामोठे नवी मुंबई येथील एम.एच.एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी रात्री 11.25 वा.त्यांचा मृत्यू झाला.











