खेड |प्रतिनिधी : कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करून सुखकर प्रवासासाठी हिसार- कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेसला
तात्पुरत्या स्वरूपात एक वातानुकूलित अतिरिक्त डबा
वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
त्यानुसार २२४७५/२२४७६ क्रमांकाची
हिसार-कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेस ६ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी तर परतीच्या प्रवासात ९ ते ३० डिसेंबर या कालावधीत एक वातानुकूलित अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. यापूर्वी एक्सप्रेस २० डब्यांची धावत होती. ती आता २१. डब्यांची धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.











