शिवम पांडुरंग चाळके याची आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

३००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त

खेड(प्रतिनिधी) नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये तु बा कदम महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. शिवम चाळके (रा. सुकिवली) याने ३००० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले

उत्तरप्रदेशामधील हरदयाळ टेक्निकल कॅम्पस, मथुरा येथे नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने घेण्यात राष्ट्रीय पातळीवरील १२ व्या नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये ३००० मीटर धावणे क्रीडा प्रकारात सिल्व्हर मेडल प्राप्त केले होते. कु. शिवम चाळके याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्था सचिव अॅड. तु. ल. डफळे, सहसचिव मा. श्री. द. भि. धुमक , खजिनदार ,श्री. राजाभाऊ बैकर, संस्था सदस्य बाबाराम तळेकर, संस्था सदस्य, श्री. दत्ताशेठ बैकर, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. साळुंखे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. जे. व्ही. पाताडे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .