अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या आत्म्याने घेतला स्वतःच्या खुनाचा बदला

तीन मित्रांच्या मैत्रीची अधुरी कहाणी

संतोष कुळे | चिपळूण : कॉलेज जीवनातील तीन जिवलग मित्र कॉलेज जीवन संपल्यानंतर खूप वर्षे संपर्कात नसतात. मात्र, पुन्हा अनेक वर्षांनी जेव्हा हे तीन मित्र एकत्र मिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटनांचा मागवा “सातबारा” या नाटकातून रसिकांना पाहावयास मिळाला. अभय, सुयश आणि विश्वास या मित्रांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि अभयने पैशाच्या मोहपायी आपल्या स्वतःच्या पत्नीचा केलेला खून आणि त्यानंतर त्याच वाड्यात तिचा वावरत असलेला आत्मा या सर्वांचा ताळमेळ सातबारा नाटकात लेखक निलेश जाधव यांनी लेखणीतून मांडला आहे. तर अमित इंदुलकर यांनी या तीनच पात्र असलेल्या नाटकाचे उत्तम दिग्दर्शन केले आहे.

हौशी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेत श्री विठ्ठल रुक्मिणी हनुमान विश्वस्त संस्था रत्नागिरी यांनी सादर केलेल्या सातबारा नाटकातून तीन मित्रांची कॉलेज जीवनातली मैत्री आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी, कॉलेज जीवनातून बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी करावी लागनारी वनवन आणि तीन मित्रांनी डोके चालवून सुरू केलेला जॉब प्लेसमेंटचा व्यवसाय असा या नाटकाचा प्रवास आहे. जेव्हा हा व्यवसाय सुरू केला . तेव्हा एक मुलगी जॉबसाठी आली. ही मुलगी दिसायला सुंदर होती. हुशार होती. त्यामुळे अभय तिच्या मागे लागला होता. तिला सुध्दा अभय आवडत होता. खऱ्या अर्थाने इथपासून सातबारा नाटकाची खरी वाटचाल सुरू होते. लेखक निलेश जाधव यांनी अतिशय खुबीने हे नाटक रंगमंचावर स्वतःच्या लेखणीतून आणि अभियानातून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा नाटक सुरू झाले. त्यावेळी अभय आपल्या वाड्यामध्ये राहत असतो. एका सूनसान जागी हा वाडा असतो. वाड्यामध्ये फक्त तो एकटा राहत असतो . मात्र कोणीतरी नेहमीच त्याचा गळा दाबल्याचा त्याला भास होत असे. वेगवेगळे आवाज कानावर येत होते. त्यावेळी तो घाबरून जायचा. मग काही वेळाने सर्व शांत होत असे . त्यानंतर एक दिवस तीनही मित्र अभयच्या वाड्यामध्ये भेटतात. प्रथम सुयश येतो. त्यानंतर विश्वास सुद्धा येतो.

सुयश हा खरंतर नकारात्मक विचार करणारा तरुण दाखवलेला आहे. त्याला प्रत्येक तू खूपच नकारात्मक बोलत असतो असे म्हणतो . मात्र तो म्हणतो की, कधी कधी नकारात्मक गोष्टीतून सकारात्मक गोष्टी घडतात. मी ज्या गोष्टी पुढे होणार असतील याचे भाष्य करत असतो. पण लोकांना त्या वाईट का वाटतात. हेच मला कळत नाही. तेवढ्यात दाराची बेल वाजते . सुयश दरवाजा उघडतो. विश्वास आलेला असतो. मात्र तो आत आल्यानंतर म्हणतो. बघितलं सुया..अरे इतक्या वर्षाने आलो ..मला वाटलं होतं की अभ्या दरवाजा उघडेल पण नाही. त्यावेळी अभय म्हणतो, बघ सुया तू म्हटलास म्हणून मी दार उघडायला गेलो नाही. जाऊ दे रे. आता एकत्र आलोच आहोत ना मग मजा करू या.

पुन्हा या तिघांची गट्टी जमते मात्र बोलता बोलता सुयश आणि विश्वासच्या मनातून अभयाने काहीतरी मोठे कृत्य केलेले आहे असे जाणवत असते. ज्यावेळी हा विषय निघतो तेव्हा अभय गंभीर होत असतो. नंतर तिघेही दारूचा स्वाद घेतात आणि अभयने त्यांच्यासाठी खास बिर्याणी मागवली असते. त्यावर ताव मारतात. हे तिघेही बोलत असताना अचानक भातुकलीच्या खेळामधली.. राजा आणि राणी.. हे गीत लागते तेव्हा विश्वास म्हणतो सुया कसले गाणे लावलेस. मला सुस्ती येत आहे. ते बंद कर. तेव्हा अभय म्हणतो सुया बंद कर रे.. सुयश बोलतो तुझं घर आहे. तुच जाऊन बंद कर . मात्र स्वतः सुयश जातो आणि ते बटन बंद करतो. दोन पावलं पुढे येतात पुन्हा ते गाणं सुरू होतं. सर्वजण चक्रवतात. अभ्या म्हणतो अरे व्यवस्थित बंद कर.. यावेळी मात्र पुन्हा सुयश ते बंद करायला जातो आणि पुन्हा ते गाणे वाजते. तिघे ही घाबरतात. शेवटी सुयश स्वीच काढूनच टाकतो. सर्व शांत होते. तोच पंधरा-वीस मिनिटे गेल्यानंतर लाईट कमी जास्त होते. आणि अचानक वीज जाते. वाड्यात अंधार पसरतो . इथे नेमकं काय होतंय सुयश आणि विश्वासला कळत नव्हते. मात्र अभय या सर्वांपासून परिचित असतो. तो म्हणतो मलाही असेच आवाज येतात. अचानक असे काही आवाज यायला लागले की डोक आवाजने बधीर होते. आवाज फक्त विश्वास आणि अभयला येत होते .

त्यानंतर सुयश म्हणतो की, निश्चितच वाड्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. सुयश आणि विश्वास म्हणातात. अभय तू आम्हाला फसवले आहेस. आमचा वाटा दिलेला नाहीस. आणि इथूनच खऱ्या अर्थाने स्टोरीला सुरुवात होते. आपण ज्यावेळी कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा तुला नोकरी नव्हती. त्यावेळी आम्ही तुला दोघांनी मदत केली . पैसा जमा करून तुझ्याकडे दिला. एक जॉब प्लेसमेंट देणारा व्यवसाय सुरू केला. आपण इतरांना नोकरी देतो त्यांच्याकडून २ हजार ते ३ हजार रुपये घेत होतो . तुझ्याकडे सहज पंधरा-वीस हजार रुपये जमा होत होते. मात्र ते सगळे तूच वापरत होतास. त्यानंतर अचानक एक मुलगी आपल्याकडे जॉब साठी येते आणि ती जॉब मागते. हळूहळू त्या मुलीला साल्या अभ्या तू आवडू लागला होतास. हे आम्ही सुद्धा ओळखले होते. मात्र अचानक काही गोष्टीमुळे अडचण निर्माण झाली आणि व्यवसाय फासला. लोकांचे पैसे देणे लागत होतो. सर्व लोक ऑफिसमध्ये येऊ लागले होते. अशावेळी विश्वास व सुयश ने अभयला एका गाडीत बसवून तिथून पाठवले. त्याच्या सोबत ती मुलगी होती. मामाकडे जातो असे अभ्या बोलला. पण तो मामा कडे गेलाच नाही. सुयशने मात्र अभ्या साठी सर्व स्वतः वर ओढून घेऊन प्रसंगाचा सामना केला. मात्र त्यावेळी अभय त्या मुलीसोबत तारुण्याची मजा घेत होता. सुयशला सगळ्या लोकांना तोंड द्यावे लागले. एवढेच नव्हे तर सर्वांचे पैसे सुद्धा सुयाने दिले.

दुसऱ्या अंकात या सर्व घडामोडी पाहवयास मिळतात. अभय त्या मुलीला घेऊन दुसरीकडे जातो. नोकरी शोधत असतो. त्याला नोकरी मिळते. सुया विचारतो, अरे मग ती मुलगी कुठे आहे. तू त्या मुलीचं काय केलंस . तू मामाकडे का गेला नाहीस . असे प्रश्न ते अभ्याला विचारतात. अभ्या म्हणतो, ती माझ्यात गुंतली होती. मी ही तिचा मनसोक्त उपभोग घेत होतो. एक दिवस समजले तिचे वडील वारले. ती रडत होती. त्यांनतर तिला घेऊन तिच्या वडिलांच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर कळले ही तर एका श्रीमंत बापाची एकुलती एक पोरगी आहे. अमाप पैसा त्यांच्या कडे आहे. मग मी तिच्याशी लग्न केले ते फक्त पैशासाठी. तिच्या पैशावर मस्त मजा सुरू होती. मला तिची सर्व संपत्ती पाहिजे होती म्हणून मी माझा डाव खेळायला सुरुवात केली. तिच्या नकळत सर्व माझ्या नावावर करण्यासाठी माझी धडपड सुरू होती. एक दिवस तिला हे सर्व कळले. मग आमचे रोजच खटके उडत होते. तिला माझ्यापासून घटस्फोट हवा होता. शेवटी गोड बोलत तिला मी या वाड्यात तिला घेऊन आलो आणि एक दिवस बोलण्यात गुंतवून लगेच तिचा गळा जोराने आवळला. इथेच तिला मी मारले. आणि तो रडू लागला. दोघेही चिडतात. सुया म्हणतो, अरे अभ्या तू मित्र म्हणून सुद्धा नालायक आहेस. तेवढ्यात जोराचा वारा सुटतो. वीज जाते येते.

अचानक सुयाच्या अंगात त्या मृत मुलाचा आत्मा शिरतो. तो विश्वासच्या दिशेने वळतो आणि त्याचा गळा दाबतो. बाईच्या आवाजात तो बोलतो, तू माझ्यावर वाईट नजर ठेवून अत्याचार केलास तिला जिवंत नाही सोडणार. तिच्या पुढे विश्वास ची धडपड संपते. मग सुया भानावर येतो. त्याला काय झाले कळत नव्हते. एवढ्यात अभयच्या अंगात मुलीचा आत्मा प्रवेश करतो. सुयशला धरतो आणि त्याचा गळा दाबून ठार करतो. आता उरला फक्त अभय. अभ्याच्या अंगातील त्या मुलीचा आत्मा अभ्याला ही संपवतो. अशा रीतीने तीन मित्र एकत्र भेटण्याची ती मुलगी वाट पहाट होती. जेव्हा हे तिघेही एकत्र आले . त्या मृत मुलीच्या आत्म्याने आपला सुड घेतला. इथेच सातबारा नाटक संपते. पैशाच्या मोहापायी अभय त्या मुलीचा जीव घेतो . त्याच्या हे दोघे मित्र ही अत्याचार करतात. ज्यावेळी अभय तिला गळा दाबून मरतो तेव्हा तिच्या हातातील घड्याळात सात वाजून बारा मिनिटे झालेली असतात. म्हणून नाटकाचे नाव सात बारा असते. हे शेवटी रसिकांना कळते.

स्त्रीला अबला समजून त्रास देणाऱ्या नराधमाना जिवंत पणे नाही जमले पण मृत्यू नंतर ही तिने आपला बदला घेतला. हेच या नाटकातून दाखवले आहे. तीनच पात्र संपूर्ण नाटकात आहेत. पण नाटक रटाळ नाही वाटले. तिघांनीही दमदार अभिनय केला होता. रसिकांनी सुद्धा या नाटकाला उत्तम साथ दिली.