साहित्यावर छोटेखानी कार्यक्रम हि केला सादर
वेंगुर्ले | दाजी नाईक : मराठि भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाड़्मय मंडळाने शिरोडा येथील वि. स. खांडेकरांच्या स्मारकाला भेट दिली. याचेच औचित्य साधून संस्थेच्या ऑफिसमध्ये वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. कौलापुरे सर यानी प्रास्ताविक व स्वागत केले. लेखिका वृंदा कांबळी यांचा संस्थेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक अजित राऊळ सर यांचाही सन्मान करण्यात आला. वृंदा कांबळी यानी वि. स. खांडेकरानी मराठी साहित्यात रूढ केलेल्या रूपककथा या वाड़्मय प्रकाराची ओळख करून दिली. प्रितम ओगले, माधवी मातोंडकर, फाल्गुनी नार्वेकर, देवयानी आजगावकर, महेश राऊळ, वकील चैतन्य दळवी, संजय पाटील, इत्यादिनी रूपक कथांचे अभिवाचन केले. साक्षी वेंगुर्लेकर हिने वि. स खांडेकरांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला. अजित राऊळ सर यानी वि. स. खांडेकरांचा जीवनपट उलगडून दाखवला. शेवटी प्रा. सचीन परूळकर यानी आभार मानले.
पि. के.कुबल, त्र्यंबक आजगावकर, सचिन दळवी, जे. जी .पाटील सर, स्वप्नील वेंगुर्लेकर, संजय पाटील, सोनाली नाईक, संकेत येराजी, सत्यम गडेकर,जान्हवी कांबळी, विकास कांबळी इत्यादी यावेळी उपस्थित होते. वि. स. खांडैकर स्मारकामध्ये वि. स. खांडेकरांविषयी असलेल्या स्मृती संग्रहालयाचा सर्वानी लाभ घेतला. कलात्मकतेने व कल्पकतेने मांडणी केलेल्या स्मृती संग्रहालयातील माहितीने सर्वजण प्रभावित झाले.












