कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन 

कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांच्या शुभहस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर परब, नुपूर पवार, चारुशीला सावंत यांच्यासह अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.