लांजा भाजपाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लांजा (प्रतिनिधी) माजी आमदार व भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार व भाजपा पदाधिकार्यांकडून लांजा शहरातील

डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

बुधवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी भाजपा

तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश मुन्ना खामकर, जिल्हा सचिव हेमंत शेट्ये, तालुका सरचिटणीस विराज हरमले, नगरसेवक गटनेता संजय यादव, नगरसेवक मंगेश लाजेकर, बाबा राणे ,बाबा लांजेकर आदी उपस्थित होते.