चिपळूण ( वार्ताहर) : कुणबी ग्रामविकास मंडळ पालवण यांच्या वतीने जि. प. शाळेत शिक्षण घेत असलेल्या श्रावणी डिंगणकर हिची इस्रो अभ्यासक्रमासाठी निवड झाली. त्याबद्दल तिचा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला.
श्रावणी हिने अतिशय कष्टाने हे यश मिळविले आहे. तिच्या जिद्दीचे आणि बुद्धिमत्तेचे सर्वांनीच कौतुक केले आहे. आपल्या लाडक्या श्रावणीचा सन्मान करण्यासाठी कुणबी ग्रामविकास मंडळ पालवण यांनी सभा आयोजित करून तिचा गौरव केला.
हा गावकर श्री. कमलाकर यांच्या येथे पार पडला. या कार्यक्रमात कुणबी ग्रा. वि. मंडळ अध्यक्ष शरद भुवड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद भुवड, कुणबी ग्रामविकास मंडळ माजी अध्यक्ष श्रीराम डिके, सचिव प्रदीप भुवड, दत्ताराम भुवड, कमलाकर भुवड गणपत साठले, विजय भुवड गावकर, माजी सरपंच गंगाराम भुवड, सिताराम भुवड, मारुती भुवड, दत्ताराम उपरे माजी सरपंच, निवळी विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन नयन सुर्वे, डॉ. कांबळे, निवळी उपसरपंच मनोज डिके, मनोज घाणेकर, निलेश काजारे, मुख्याध्यापक श्री. रंगाटे तसेच शाळेतील विद्यार्थी , गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत भुवड यांनी केले.









