चिपळूण (वार्ताहर) : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याला चिपळूण काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष इब्राहिम दलवाई, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव, माजी नगरसेविका सफा गोठे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, मीरा नारकर, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, मुन्ना दळी, तालुका सचिव संजय डेरवणकर, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष रुपेश आवले, दत्तात्रय शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव आदी उपस्थित होते.
रामपूर परिसरातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रामपूर बौद्धवाडी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभाच्या येथे येऊन अभिवादन करून, आदरांजली वाहण्यात आली. रामपूर-मार्गताम्हणे पत्रकार संघाच्या वतीने रामपूर कालकाई नगर, शिक्षक कॉलनी येथे पत्रकार संघ कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस संघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. रामपूर परिसरात ग्रामपंचायती कार्यालय, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, बौद्धवाडी विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.












