खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल आंबवली विद्यालयात शिक्षक पालक संस्था पदाधिकारी विद्यार्थी सभे मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगती साठी टिव्ही मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला
अमृत महोत्सवी वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी संस्थेतर्फे विविध शैक्षणीक व सांस्कृतीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वाढावी यासाठी योगासना सारखे उपक्रम राबविण्यात येत असून, उज्वल यशासाठी टीव्ही व मोबाईल बंद करण्याचे एकमुखाने निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षपद विजय गोगावले यांनी भुषविले. कार्यक्रमासाठी चेअरमन विश्वास कदम मुकुंद यादव, संस्थाध्यक्ष प्रकाश महाडीक संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य के जे झंझने शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.









