चिपळूण (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक सुरेशशेठ चिपळूणकर यांची नुकतीच निवड झाली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेशभाई कदम यांनी चिपळूणकर यांच्या वाढदिनी दिले. ही निवड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे.
चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष नामवंत ठेकेदार माजी नगरसेवक सुरेशशेठ चिपळूणकर यांचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम यांनि सुरेशशेठ चिपळूणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र सुपूर्द केले.
या निवडीबद्दल आपल्या मनोगतात सुरेशशेठ चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. तसेच चिपळूणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक अविनाश केळस्कर, राजेश कदम, रमेश खळे, दिनेश शिंदे, वासुदेव मेस्त्री, संजय चिपळूणकर, रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण या संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते












