शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना फोडली वाचा
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय किसान संघ महाराष्ट्राच्यावतीने सावंतवाडी प्रांताधिकार्यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मागणी करण्यात आली. निवेदनावर विचार करून तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या हितार्थ किसान संघाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनात दुष्काळ परिस्थितीत पुनर सर्वेक्षण करून उर्वरित तालुक्याचा समावेश करावा, दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात उपायोजनेची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी, विज बिल आकारणी सदोष असून त्यामध्ये प्रचंड अनागोंदी आहे सबब एक वेळ वीज बिल थकबाकी सरसकट माफ करावी तसेच अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षानुवर्षी मिळणारे वीज पुरवठा वरील अनुदान व त्यांच्यावर श्वेतपत्रिका काढावी, मागेल त्याला विनाअट ९० टक्के अनुदानवर सौर शेती पंप योजना उपलब्ध करून द्यावी तसेच अग्रीम पिक विम्याचे अग्रीम २५ टक्के नुकसान रकमेचे व अंतिम नुकसान भरपाई चे तात्काळ वाटप करायचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत.
खरिपात नुकसान होऊन सुद्धा पुन्हा कर्जाऊ भांडवल उभारून यावर्षी रब्बी पिकाची पेरणी केली होती परंतु गत पंधरावड्यात पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उगवून आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत त्यांचे नुकसान भरपाई हेक्टरी २५ हजार रुपये देऊन पीक कर्जाचे पुनर्गठन करावे तसेच वाढीव पाणीपट्टी केलेली जलसंपत्ती नियमात प्राधिकरणाचा २९ मार्च २०२२ हा जुलामी आदेश तात्काळ रद्द करावा व ऊस एफ आर पी ची अंमलबजावणी राज्य सर्व साखर कारखान्यांना सक्तीची करावी व प्रति टन ४०० रुपये बोनस उत्पादकांना राज्य सरकारने मंजूर करावा.
याच बरोबर प्रामाणिक कर्जदार यांना जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान ५० हजार अद्याप अदा केले नाही ते तात्काळ जमा करावे वन्यप्राणी पक्षी जीव यांच्या कडून होणारी पिकांची नुकसान भरपाई १०० टक्के सरकारने करावी अन्यथा त्याच्यापासून संरक्षण करावे {आवश्यक तर प्राणी हत्या} अधिकार शेतकऱ्यांना द्यावे.
मा. राज्याने सुरक्षा आयोग आयोगाचे अध्यक्ष यांनी विविध सवलतीचे धान्य वाटप योजनेसाठी धान्य खरेदी स्थानिक पातळीवर करण्याची केलेली शिफारस तात्काळ अमलात आणावी
व हमीभावापेक्षा कमी बाजार भाव सर्व शेतकऱ्यांकांना मिळत आहे त्यासाठी पीएम अशा २०१८ योजनेची अंमलबजावणी करावी, अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.
यावेळी भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष सूर्यकांत कुंभार, कोषाध्यक्ष रामकृष्ण पंतवालावलकर, जिल्हापती अभय भिडे, जयराम परब तालुकाध्यक्ष कुडाळ, रामचंद्र शिंगारे कार्यकारणी सदस्य, रसिका पारकर महिला जिल्हाध्यक्ष, स्वाती पिंगुळकर महीला तालुका प्रमुख, धनश्री सारंग, शीला रावले, अक्षय बाणे, महेंद्र धुरी, विजय परब, मेघना सावंत, मेघशाम राणे आदी उपस्थित होते.










