कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन कार ची धडक

 

अपघातात पाच प्रवासी जखमी : जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले

मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ सागरी महामार्ग येथे दोन कार मध्ये समोरासमोर धडक बसून शुक्रवारी दुपारी अपघात झाला. यात पाच जण जखमी झाले. १०८ रुग्णवाहिकेतून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ४ वाजण्याच्या दरम्यान घडला.

अपघाताची माहिती मिळताच कुंभारमाठ माजी सभापती मधुकर चव्हाण, माजी उपसरपंच श्री. चव्हाण, सदस्य राहुल परब,
ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे, ग्रामस्थ सुनील वस्त व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, धोंडू जानकर यांनी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातील जखमिंची माहिती मिळाली नाही.