मिरजोळे-पाटीलवाडी येथे हातभट्टीवर शहर पोलिसांनी धाड;साडेबारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एकावर गुन्हा दाखल
 
रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीवर शहर पोलिसांनी धाड टाकली.यात साडेबारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई गुरुवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 9.10 वा.करण्यात आली.

संदीप वसंत जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील नदी किनारी असलेल्या जंगलमय भागात गावठी हातभट्टी चालवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार,पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याठिकाणी धाड टाकून गावठी दारु,गुळ नवसागर मिश्रित कुजके रसायन,गोलाकार आकाराची डेग आणि इतर साहित्य असा एकूण 12 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ब)(क)(ड)(फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.