सुधीर काजरोळकर यांनी आबलोली गावाच्या नावलौकीकात भर टाकली : सरपंच वैष्णवी नेटके
गुहागर (प्रतिनिधी): इंटरनॅशनल डॉग कॉम्पिटिशन मध्ये प्रोटेक्शन आणि ओबीडियन्स या प्रकारातील रेकाॅर्डब्रेक करत सुधीर काजरोळकर यांनी आबलोली गावाच्या नावलौकीकात भर टाकली आहे,असे गौरोद्गार सरपंच वैष्णवी नेटके यांनी काढले.
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र असलेले
सुधीर काजरोळकर यांच्या माध्यमातून आबलोली गावाचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चमकले आहे.त्याबद्दल सरपंच वैष्णवी नेटके यांनी सुधीर काजरोलकर यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.
यापूर्वी SK-4 हळदीचे वाण विकसीत केल्यामुळे आबलोली गावचे सुपुत्र सचिन कारेकर यांना नॅशनल इन्नोव्हेशन फाऊंडेशनचा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्राप्त झाल्यामुळे आबलोली गावाचे नाव देशपातळीवर पोहचले होते. आता
इंटरनॅशनल डॉग कॉम्पिटिशन मध्ये प्रोटेक्शन आणि ओबीडियन्स या प्रकारातील रेकाॅर्डब्रेक करत सुधीर काजरोळकर यांनी आबलोली गावाच्या नावलौकीकात आणखी भर टाकली आहे. कुठलयाही प्रकराचे प्रशिक्षम नसताना सुधीर यांनी गेली 13-14 वर्षे स्वतः प्रयत्न व प्रयास करून ते या सन्मानापर्यंत पोहचले आहे.
प्रोटेक्शन स्पोर्ट असोसिएशन अमेरिका या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या दिल्ली येथील इंटरनॅशनल डॉग कॉम्पिटिशन मध्ये प्रोटेक्शन आणि ओबीडियन्स या प्रकारातील राष्ट्रीय स्तरावरील आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून सुधीर काजरोळकर यांनी नवा रेकॉर्ड निर्माण केला व PSA 1 चॅम्पियनशिप वर आपले नाव कोरले त्याबद्दल
आपल्या आबलोली गावासह देशाचे नाव उज्ज्वल झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,अशी प्रतिक्रीया आबलोलीकरांनी व्यक्त केली आहे. सर्वत्र सुधीर काजरोलकरांचे अभिनंदन व कौतूक करण्यात येत आहे.









