गुहागर प्रतिनिधी:
वेळंब नालेवाडी येथील श्री हनुमान मंदिरत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी झाला. मंगळवारी रात्री स्थानिक भजने, नारदिय कीर्तन कीर्तनकार सुमंत भिडे (मळण)) यांनी केले. बुधवारी सत्यनारायणाची महापूजा, रात्री स्थानिक भजने, श्री हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ मुंबई निर्मित हृदयस्पर्शी, कौटुंबिक जिव्हाळयाचे ३ अंकी रत्याग र नाटक सादर केले. या नाटकामध्ये प्रमोद जोयशी, अभिजीत जाधव, भिकाजी माळी, सुरज नांदलस्कर, अविनाश नांदलस्कर, संजय
नांदलस्कर, ओमकार नांदलस्कर, सुनैना कोंडविलकर, मुंबई, पाहुणे कलाकार अविनाश जाधव, किशोर नांदलस्कर यांनी उत्कृष्ट भूमिका पार पडली. गुरुवारी पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव व दिंडी सोहळा झाला. या दिंडी सोहळ्यामध्ये नालेवाडी ग्रामस्थ मंडळातील सर्व ग्रामस्थ व मुंबईकर तसेच महिला व पाहुणे मंडळी सहभागी झाली होती. ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच गुलाल उधळीत श्री हनुमंत व राम नामाचा गजर करत भव्य आणि दिव्य अशी दिंडी काढली.












