खेड : येथील इन्फिगो हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रेटिना विभाग आहे. येथे हॉस्पिटलचे रेटिनातज्ञ डॉ. प्रसाद कामत अतिशय अवघड व गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटल सुरु झाल्यापासून करीत आहेत. आता डॉ. कामत दिनांक 13 आणि 14 रोजी रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत.
इन्फिगोच्या रेटिना विभाग B- Scan, Green Lazer, 3D OCT व अत्याधुनिक अर्टली VITRECTOMY मशीन अशा यंत्रांनी सुसज्ज आहे. खालील लक्षणे असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. सतत चष्माचा नंबर बदलणे, अचानक नजर कमी होणे, पडदा सरकणे किंवा पडद्याला सूज येणे, डायबेटिसमुळे दृष्टी कमी होणे, ४० वर्षांपेक्षा अधिक वय असल्यास, डोळ्यातील प्रेशर वाढणे, डोळ्यापुढे काळे ठिपके दिसणे, मायनस ३ पेक्षा अधिक नंबरच चष्मा असल्यास
मुख्य डायबेटीस असणाऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा. कारण डायबेटिसमुळे डोळ्यांच्या पडद्यावर दुष्परिणाम होत असतात व ते कायमस्वरुपी असतात.
दि. १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या रेटिना तपासणीसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. तपासणीसाठी थोडा वेळ लागत असल्याने सोबत एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. तरी मंडणगड, दापोली, खेड, येथील नागरिकांनी ९१३७१५५४९० या क्रमांकावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन इन्फीगो हॉस्पिटलने केले आहे.









