वार्ताहर l पाली :रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाली येथे
किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी व पाली प्रीमियर लीगचे आयोजन दिनांक ३,४,५,६,७ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नोंदणी तातडीने करावयाची आहे. संघाच्या खेळाडूंनी येताना आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेत्या संघाला रुपये १,११,१११ व चषक तसेच उपविजेत्या संघाला रुपये ७७,७७७ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. मालिकावीर रुपये ५,५५५,उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज रुपये ३,३३३ खेळाडूंना देण्यात येणार आहे तसेच पाली प्रीमियर लीगमधील विजेत्या संघाला रुपये ६६,६६६ व चषक तसेच उपविजेत्या संघाला रुपये ४४,४४४ व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. मालिकावीर रुपये ५,५५५,उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज रुपये ३,३३३ खेळाडूंना देण्यात येणार आहे. संघांनी नाव नोंदणी व अधिक माहिती करिता सौरभ खाके ७२७६१८१५२७, अतुल सावंत ९४०४१६०३३४,मनीष सावंत ८६०५३५६९९९,नितीन गराटे८९९९१९८४२८ ओशो सावंत ८६००६८२७२९
या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन किरणोदय प्रतिष्ठान पाली व बाळासाहेबांची शिवसेना पाली यांनी केले आहे. या भव्य ओव्हरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र पाली हेलिपॅड मैदानावर होणार आहेत.











