आंबये केंद्राचा शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात.

 

खेड(प्रतिनिधी) शासनाच्या स्टार्स उपक्रम अंतर्गत खेड तालुक्यातील आंबये केंद्राचा शाळा पूर्वतयारी मेळावा सचिन कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्र मुख्याध्यापक मंगेश वायकर यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक व पालक, शाळेत दाखल होणारे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श शाळा आंबये पाटीलवाडी शाळेत उत्साहात संपन्न झाला..

 

जिल्हा परिषदेतील शाळांतील विद्यार्थी उपस्थिती वाढावी. पटसंख्या वाढ व्हावी या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आंबये केंद्राचा शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. यावेळी नव्याने पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात व पारंपारिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी स्वागत केले तसेच त्यांचे छोटे छोटे खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये सजावट करण्यात आली. त्यांचे पारंपारिक तसेच बौध्दिक खेळ घेण्यात आले. या बालकांनी देखील शिक्षकांशी सुसंवाद साधला.

 

या मेळाव्याला खवटी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी संतोष भोसले व केंद्रीय प्रमुख भाऊराव दराणे यांनी भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पालकांशी देखील चर्चा केली. या मेळाव्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नितिन डोईफोडे व राहुल तुगांवकर यांनी काम पाहिले. यावेळीआंबये केंद्रातील सर्व शिक्षक तसेच गावातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्र संचालन सुप्रिया सावर्डेकर यांनी केले तर सुविधा सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.