कुंभाळजाई’ गिर्यारोहण मोहीमेची रविवारी सांगता 

खेड (प्रतिनिधी) आठ गाव मोरे (राव) परिवार संचलित श्री कुंभाळजाई सामाजिक विकास संस्थेमार्फत ९ व १० डिसेंबर याकालावधीत सुभाप्रांत जावळी खोऱ्यात ‘सहवास सह्याद्रीचा पर्व सात’ गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते रविवारी या मोहिमेची सांगता होणार आहे

 

वणवे, बेसुमार मानवनिर्मित जंगलतोड रोखण्यासाठी जनजागृती या उपक्रमाद्वारे केली जाणार आहे. हा उपक्रम रसाळगड ते महिपतगड अशा परिक्रमेत असून यात गडकिल्ले, खोंड, सुळके, प्राचीन देवस्थान यांचा समावेश आहे. श्री कुंभाळजाई सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष भाऊराव मोरे, सचिव प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येणार आहे.