बौध्द समाजातील मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचा-यांची सभा

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील बौध्द समाजातील महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मानधन तत्वावर काम करण्या-या कर्मचा-यांची सभा शनिवारी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे पार पडली.

या सभेत संघटना बांधणी , संघटना ची ध्येय धोरणे यावर सकारात्मक रित्या चर्चा करण्यात आली
या वेळी महाराष्ट्र शासनाच्या मानधन तत्वावर सेवेत असणारे पोलीस पाटिल, कोतवाल,वसतिगृह कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनिस अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी बहुसंखेने उपस्थित होते