सावंतवाडीत १२ फेब्रुवारी रोजी वैश्य समाज वधुवर मेळावा

Google search engine
Google search engine

महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकातील वधूवरांचा सहभाग

वैश्य समाज सावंतवाडी मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सिंधुदूर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका वैश्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ फेब्रुवारी रोजी सावंतवाडीत वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यातील वधूवरांचा सहभाग असणार आहे. समाज बांधवांचे प्रबोधन होत असताना उद्योग व्यवसायाचे नव्या दिशेने दर्शन व्हावे आणि त्यांच्यासोबत परस्पर परिचयातून कुटुंब व्यवस्था सशक्त होऊन समाज संघटना बळकट व्हावी या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे आणि स्वागत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली.

दरम्यान, भविष्यात शहरातील वैश्य भवनच्या इमारतीवर वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच अन्य हालचाली आम्ही सुरू केल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, पुष्पलता कोरगावकर, बाळ बोर्डेकर, समिर वंजारी, गितेश पोकळे, प्रतिक बांदेकर, कपिल पोकळे आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. दिलीप नार्वेकर म्हणाले, वैश्य समाज सावंतवाडी मंडळ यावर्षी शतक महोत्सव साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर तीन राज्यांचा वधूवर मेळावा या ठीकाणी आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत-जास्त लोकांची स्थळे जुळावीत यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन तेली उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, वैश्य समाज पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पारकर, उद्योजक शालीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषदेचे अध्यक्ष सुब्राय शेठ उर्फ सुभाष मसुरकर, बेळगाव वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कनबर्गी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहीतीही यावेळी देण्यात आली. या मेळाव्यात जास्तीत-जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

Sindhudurg