दुर्दैवी! रेल्वे स्टेशनसमोरील फाटकाला दुचाकीची धडक बसून तरुणाने गमावला प्राण

रत्नागिरी ः प्रतिनिधी

रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोरील फाटकाला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

सम्राट मारुती देसाई (34,मुळ रा.गोळप सध्या रा.थिबा पॅलेस रोड,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.शुक्रवारी रात्री सम्राट आपल्या तब्यातील दुचाकी घेउन भरधाव वेगाने रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जात होता.त्याचा दुचाकीवरील ताबा सूटल्याने दुचाकीची धडक तेथील फाटकावर आदळली.यात सम्राट गंभिर जखमी झाल्याने त्याच ठिकाणी अर्धा तास बेशुध्द अवस्थेत पडून होता.

दरम्यान मुुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागली.या रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना त्याठिकणी अपघातग्रस्त दुचाकी आणि त्यावरील तरुण जखमी अवस्थेत बेश्ाूध्द पडलेला दिसून आला.त्यांनी पोलिसांनी याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सम्राट देसाईला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी सम्राटला तपासून मृत घोषित केले.