तुळस येथे हस्ताक्षर सुधार कार्यशाळा संपन्न : सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सुरूचि मराठे प्रथम..

श्रीमंत पार्वती देवी वाचनालय तुळस चे आयोजन

वेंगुर्ले | प्रतिनिधी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या औचित्याने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस यांच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्थेचे कै. रा. य.तुळसकर सभागृह) येथे शालेय मुलांच्या हस्ताक्षर सुधारणेसाठी कार्यशाळेचे आयोजन : करण्यात आले. नेमळे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक,भाषातज्ञ विकास गावकर यांनी हस्ताक्षर सुधारण बाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.मात्रा,वळण,वेग, अंतर,वेलांटी अशा दहा मुद्दयावर चर्यात्मक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना हस्ताक्षर कसे असावे आणि त्यासाठी तंत्र काय असावे याविषयी मार्गदर्शन केले.

हस्ताक्षर कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमत पार्वतादेवी वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक विकास गोवेकर, वाचनालय खजिनदार प्रकाश परब, प्रा. सचिन परुळकर, सुजाता पडवळ संजय पाटील सर, ढोले-पाटील सर, सानाप सर,सुतार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
य कार्यशाळेच्या अनुषंगाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये खालील
विद्याथ्यांनी यश संपादन केले. प्रथम क्र- सुरुचि संदीप मराठे
व्दितीय क्र- सोनल संदीप मराठे तृतीय क्र- पुष्कर विजय पेडणेकर
उत्तेजनार्थ प्रथम- हर्षदा बाळकृष्ण होडावडेकर
उत्तेजनार्थ द्वितीय- अनुष्क अमोल अडके यांनी यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना वाचनालय तुळस कडून मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सचिन परुळकर यांनी तर आभार शिक्षक ढोले – पाटील यांनी मानले.