शिपोशी येथील बाईंगगाव व शिपोशी गावाला जोडणाऱ्या काजळी नदीवरील पुल मंजूर 

भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांचे प्रयत्नाने पुलाला मंजुरी 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिपोशी ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील श्री हरीहरेश्वर मंदिराजवळील बाईंगगाव व शिपोशी गावाला जोडणाऱ्या काजळी नदीवर पुल मंजूर झाला आहे. भाजपा नेत्या व राजापूर साखरपा लांजा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांचे प्रयत्नाने या पुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तालुक्यातील शिपोशी गावामध्ये भाजप पक्षाची ताकद कमी असतानादेखील या ठिकाणी असलेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून गेली कित्येक वर्ष रखडलेल्या पुलाला पाच कोटी एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे . यासाठी. शिपोशी भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

हा पुल व्हावा यासाठी बंडू कांबळे गुरुजी, कै. बेलवलकर असे अनेक स्थानिक ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच शिपोशी खामकरवाडी जाधववाडी खाडिकरण व डांबरीकरण ही कामे प्रामुख्याने उल्का विश्वासराव यांनी हाती घेतली असून तीपण यावर्षी होण्याची शक्यता आहे.

______________