प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्स च्या वतीने २६ ते २८ जानेवारी या कालावधीत प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीगचे आयोजन 

लांजा  ( प्रतिनिधी) प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्स च्या वतीने २६ ते २८ जानेवारी या कालावधीत प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीगचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे.

ही स्पर्धा वाघजाई मंदिर पटांगण येथे होणार असून त्यासाठी दहा संघ मालक,एकूण संघ दहा आणि एकूण १३० खेळाडू असणार आहेत. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकांना देखील आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. तर मालिकविर ठरणाऱ्या खेळाडूस सोहेल शेरखान यांचेकडून सायकल तसेच उत्कृष्ट फलंदाजाला आकेश गावखडकर यांचेकडून कूलर व ,उत्कृष्ट गोलंदाजाला आसिफ म्हालदार यांचेकडून पंखा देऊन व इतर वैयक्तीत बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, सामनावीर, सर्वात जास्त धावा व सर्वात जास्त विकेट, सर्वाधिक षटकार तसेच एमर्जिंग प्लेयर ऑफ द pkpl साठी देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

______________________________________