माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांची आट्या पाट्या खेळाच्या प्रकारात राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.
नुकत्याच सांगली जिल्ह्यातील पलूस येथे झालेल्या विभागीत आट्या पाट्या खेळात माखजन हायस्कुल च्या यश नाचरे,सिद्धेश जाबरे, ओंकार दहिवलकर,सुयोग गांगरकर यांची वैयक्तिक खेळतील नैपुण्य पाहून त्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.पलूस येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत रत्नागिरी,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,कोल्हापूर,आदी जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक निखिल वारके व अभिजित सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरा साठी निवड झाल्याने मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,संस्था अध्यक्ष आनंद साठे,उपाध्यक्ष मनोज शिंदे व अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदण केले आहे.












