खेड मधील लोकअदालतमध्ये ४६ लाख रुपयांची सामोपचाराने तडजोड

खेड(प्रतिनिधी) खेड येथे झालेल्या लोकअदालतीमध्ये एकूण ६१ प्रकरणांमध्ये ४६ लाखांची तडजोडीने निकाली झाली. सदर लोकअदालतमध्ये ५४४ पैकी ४६ प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच वादपुर्व १५ प्रकरणे तडजोडीने सांमजस्याने निकाली निघाली. त्यामुळे पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला अशी माहिती खेड जिल्हा न्यायाधीश डॉ सुधीर देशपांडे यांनी खेड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली.

सदर लोकअदालतमध्ये न्यायाधीश व वकीलांचे सहा पॅनल चे नियोजन करणेत आलेले होते. या लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्री पी.एस.चांदगुडे, दिवाणी न्यायाधीश श्री.एन.एस. निसळ, श्री. एम. व्ही. तोकले, श्री. एस. एम. चव्हाण, श्रीमती पाटील तसेच पॅनल विधीज्ञ श्री.नाईक, श्रीम चाळके, श्री. थरवळ, श्री बुटाला, श्री मेटकर, श्रीम दाते यांनी पाहिले. त्याचप्रमाणे खेड येथील वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी करणेकामी तालुका विधी सेवा समिती खेड यांना सहकार्य केले. याप्रसंगी अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले.