खेड तालुका महसूल कर्मचारी तालुका अध्यक्षपदी उमेश गिज्जेवार बिनविरोध

चिपळूण (प्रतिनिधी) : उपविभागीय महसूल कर्मचारी संजय मद्रे यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयातील सभागृहामध्ये खेड तालुका महसूल कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये खेड तालुका महसूल कर्मचारी तालुका अध्यक्षपदी उमेश गिज्जेवार, अव्वल कारकून, उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करणेत आली आहे.

तसेच उपाध्यक्षपदी चंदन जाधव, कार्याध्यक्षपदी पांडूरंग डोके, महिला उपाध्यक्ष श्रीमती अश्विनी नामदेव विनकर, सरचिटणीस म्हणून नामदेव काळबोंडे, खजिनदार आनंद सावंग, सहसचिव पुरुष अक्षय पवार, सहसचिव महिला श्रीमती कविता नलावडे, सहचिटणीस अनिल जाधव, सहखजिनदार श्री. गावित व सल्लागार म्हणून अशोक खेतले यांची निवड करणेत आली. या निवडी प्रसंगी बळीराम पंडे, अव्वल कारकून व खेड तालुका सर्व महसूल कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.