आयएमए रत्नागिरीची ‘केअर फॉर केअरटेकर्स’ कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी | प्रतिनिधी: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांच्या पुढाकाराने ‘केअर फॉर केअरटेकर्स’ अर्थात ‘रुग्णांची काळजी घेणाऱ्यांची काळजी’ या मिशन अंतर्गत रत्नागिरी शहरातील विविध रुग्णालयातील परिचारिका नर्सेस आणि रुग्ण सेवेंशी संबंधित कर्मचाऱ्यांची एक विशेष कार्यशाळा रविवारी 10 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ‘रुग्णांवरील रोगप्रतिबंधक उपचार’ या विषयावर डॉ. रश्मी आठल्ये आणि तसेच आपण कमावणाऱ्या पैशांचे व्यवस्थापन कसे करावे, गुंतवणूक कशी आणि कुठे करावी या विषयावर कृष्णन अय्यर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिले. या वेळेला उपस्थित सर्व नर्सेस आणि रुग्णसेवेची संबंधित कर्मचाऱ्यांना आयएमए रत्नागिरीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यशाळेला परिचारिका आणि रुग्ण सेवेशी संबधित कर्मचार्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशाप्रकारे या कर्मचार्यांसाठी घेतल्या जाणार्या अशा कार्यशाळाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. तोरल शिंदे यांनी आयएमए रत्नागिरीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचार्यासाठी घेतली जाणारी ही दुसरी कार्यशाळा असून ‘केयर फॉर केअरटेकर’ या विशेष कार्यशाळेबद्दल आयएमए रत्नागिरीचे विशेष कौतुक वैद्यकीय क्षेत्रामध्ये केले जात आहे. यावेळी डॉ. शिंदे यांच्यसह सचिव डॉ. प्रज्ञा पोतदार उपस्थित होत्या.