वाशी फाटा नजीक ट्रक च्या धडकेत बैलाचा मृत्यू

 

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील आवाशी फाटा नजीक एका ट्रकच्या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली या अपघाता नंतर मृत्यूमुखी पडलेले मुके जनावर उचलायला कोणीच पुढे न आल्याने बराच काळ त्या ठिकाणी पडून होते

एका ट्रकच्या धडकेत बैला चा मृत्यू झाल्याची माहिती संदेश महाडिक यांनी युवा समाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांना दिली. त्या नुसार सागवेकर त्यांनी खेड मधील स्थानिक पोलीस स्थानक तसेच आवाशी ग्रामपंचायत यांना कळवले त्यानंतर बऱ्याच कालावधी ने जेसीबी द्वारे त्या मृत बैलाला रस्त्यावरून उचलून विल्हेवाट लावण्यात आली
सामाजिक कार्यकर्ते सागवेकर यांनी खेड पोलीस स्थानक व आवाशी ग्रामपंचायत चे आभार मानले.