सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या मालवण दौरा पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सर्व खबरदारी ; किल्ले सिंधुदुर्ग व जेटी परिसरात प्रशासनाची ‘क्लीन’ मोहीम

मालवण | प्रतिनिधी : सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या १ फेब्रुवारी रोजी नियोजीत मालवण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणात तयारी सुरू आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, मालवण पोलीस निरीक्षक, तसेच सुरक्षा यंत्रणा गेले काही दिवस मोहन भागवत यांच्या दौरा मार्गावरील सुरक्षा उपाययोजना नियोजनात व्यस्त आहेत.

मोहन भागवत हे मालवण दौऱ्या दरम्यान मंगळवारी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार असल्यामुळे सिंधुदुर्ग किल्यावर प्रशासनाच्या वतीने मंगळवारी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. परिसर क्लीन करण्यात आला.

महसूल, कृषी, पंचायत समिती, वायरी ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, यांस बरोबर मातृत्व आधार फाऊंडेशन आदी संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली
निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, महसूल नायब तहसीलदार आनंद मालवणकर, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर, ममता तळगावकर, ग्रामविकास अधिकारी युवराज चव्हाण, युती चव्हाण, मनीषा गोसावी, पी टी पेडणेकर, बाबू सुतार, मंडळ अधिकारी अजय परब, तलाठी वसंत राठोड, लक्ष्मण देसाई, रविराज शेजवळ, योगेश माळी, ग्राम विकास अधिकारी एस डी चव्हाण, कृषी अधिकारी डी एल लंबे, मंडळ कृषी अधिकारी ए आर कांबळे, कृषी पर्यवेक्षक डी डी गावडे, मातृत्व फाऊंडेशन अध्यक्ष संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री संदीप बोडवे, बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष विश्वास गावकर, सोनाली पाटकर, दीक्षा गावकर, राधिका मोंडकर आदी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून किल्ला परिसराची साफसफाई करून घेण्यात आली.

बंदर जेटीवरील अस्वच्छता दूर

प्रशासनाच्या सूचनेवरून
बंदर जेटी परिसरातील मुख्य मार्गावर अडथळा ठरणाऱ्या वस्तू दूर करण्यात आल्या. या परिसरातील अडगळीच्या वस्तूही दूर करण्यात आल्या. अस्वच्छता दूर करण्यात आली. बंदर विभागाचे कर्मचारी याठिकाणी लक्ष ठेऊन होते.

त्या परिसरातही कडेकोट बंदोबस्त

वायरी मार्गावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉक्टर मधुकर दिघे यांच्या निवास स्थानी सर संघ चालक भेट देणार असल्यामुळे या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.