लांजा (प्रतिनिधी) मौजे रूण ग्रामविकास मंडळ पराडकर वाडी, मुंबई चे वतीने आयोजित रक्तदान शिबिर दादर मुंबई पब्लिक स्कूल येथे उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. यावेळी ४७ रक्तदात्यानी रक्तदान केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पराडकर, सचिव प्रमोद मोरे, खजिनदार अनिल सुर्वे, सदैव सहकार्य करणारे संदेश कुलये आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान कक्षाची फित कापून अन् दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. गावातून तसेच पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला. जवळपास एकूण रक्तदात्यांमध्ये पाहिल्या प्रथम रक्तदान करणारे ८०%तरुण होते. मनामध्ये असणारी भीती, गैरसमज बाजूला करत अनेकांनी रक्तदान केले. श्री अचलेश्र्वर क्रिकेट मंडळाने या उपक्रमात उत्तम सहकार्य दिले. मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या या उपक्रमात ४७ रक्तदात्यानी रक्तदान केले. १५ जण रक्त देऊ शकले नाहीत.
सदर उपक्रमात श्री अचलेश्र्वर क्रिकेट मंडळ, गोंदवलीवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष उमाजी जोंधळे, सदैव सहकार्य करणारे प्रकाश पाष्टे, किसन जोंधळे आणि इतर सहकारी उपस्थित होते. गावातील प्रसिद्ध व्यावसायिक दीपक चंदुरकर यांनी यावेळी देखील बहुमोल सहकार्य केले.
लो. टिळक म. स. रुग्णालय रक्तकेंद्र सायन मुंबई या पेढीच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. मंडळ अध्यक्ष प्रभाकर पराडकर यांनी या आगळ्या उपक्रमात सहभागी झालेले रक्तदाते, देणगीदार, आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अंतिमतः आभार मानताना हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे समाधान व्यक्त केले.











