आ.योगेश कदम यांनी वेधले हिवाळी अधिवेशनात लक्ष
खेड (प्रतिनिधी) खेड, चिपळूण आणि दापोली येथे प्रत्येकी शंभर बेडची हॉस्पिटल आहेत. परंतु, एकाही हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी नाही. त्यामुळे केवळ आणण्यासाठी शंभर कि.मी. प्रवास करावा लागतो. कारण फक्त रत्नागिरी येथेच जिल्हा रुग्णालयात शासकीय रक्तपेढी उपलब्ध आहे, अशी माहिती देत खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान रक्तपेढीबाबत प्रश्न उपस्थित केला.
हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या भागात आरोग्य विषयक सुविधांची कमतरता भरून काढण्यासाठी आ. योगेश कदम यांनी यावेळी किती दिवसांमध्ये या सर्व हॉस्पिटलमध्ये रक्तपेढ्या सुरू करणार? असा प्रश्न आ. योगेश कदम यांनी विचारल्यानंतर संबंधित मंत्री यांनी दोन महिन्यांत प्रस्ताव मिळाल्यास मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे.











