सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बाहेरचावाडा दाऊद बेग घरामागील नगरपरिषदेच्या मालकीच्या निर्लेखित केलेल्या जागेत बहुउद्देशीय सभागृहाचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी २४ लक्ष ५२ हजार ५८९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम माजी नगरसेवक नासिर शेख व माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे.
या भूमीपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजप जिल्हाकार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, जहूर शेख, गुलजार खान, नुमान आगा, सज्जाद खान, फरहाद बेग, नसीम बेग, नजनीन बेग, खालिद बेग, रवी नाईक, सचिन साटेलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.












