आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या माध्यमातून नर्सिंग असिस्टंट कोर्स

विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना संधी; शासनमान्य प्रमाणपत्र उपलब्ध होणार

सावंतवाडी । प्रतिनिधी : राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था आणि खेरवाडी केअर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीतील आयुर्वेदिक महाविद्यालयात नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरू करण्यात येणार आहे.यात दहावी व बारावी पास असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी नर्सिंग शिकण्याची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे उपप्राचार्य डाॅ. संजय दळवी यांनी दिली.संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी प्राचार्य विकास कठाणे संचालक उमाकांत वारंग, कर्मचारी राजू सावंत,जयंत बेकनाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. संजय दळवी म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना व्यवसायभिमुख शिक्षण घेता यावे या उद्देशाने राणी जानकीबाई साहेब वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून या शासनाची मान्यता असलेल्या या कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे हा कोर्स नऊ महिन्याच्या कालावधीचा असणार आहे. तर त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ खाजगी रुग्णालय नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे संचालक उमाकांत वारंग म्हणाले, या ठिकाणी माफक दरात स्थानिक विद्यार्थ्यांना नर्सिंग असिस्टंट कोर्सचे शिक्षण मिळावे असा आमचा आग्रह आहे तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कोर्स सुरू केला आहे. त्यामुळे अगदी अत्यल्प किमतीत आम्ही हा कोर्स संबंधित विद्यार्थ्यांना देणार आहोत या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून मेडिकल, सर्जरी, स्त्री रोग, बालरोग नेत्ररोग आणि पंचकर्म अशा विविध सुविधा दिल्या जातात त्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थ्यांना सर्व बाबींचे ज्ञान होणार आहे आणि भविष्यात त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा फायदा घ्यावा तसेच भविष्यात आणखी कोर्स सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.