इनरव्हील सावंतवाडीतर्फे जयपूर फूट व कृत्रीम हात बसवणे उपक्रम संपन्न

रोटरी क्लब व लोक-कल्याण मंडळ कोल्हापूर यांचे सहकार्य

उपक्रमाचा ५० हून अधिक लाभार्थ्यांनी घेतला लाभ

सावंतवाडी । प्रतिनिधी : इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर लोक-कल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या सहकार्याने जयपूर फूट कृत्रिम पाय व हात बसवणे हा कार्यक्रम मंगळवारी सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचा सुमारे ५० हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने लाभार्थ्यांना पूर्ण मोफत कृत्रिम पाय व हात देण्यासाठी लाभार्थ्यांच्या हातापायांचे मेजरमेंट घेण्यात आले.पुढच्या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना इनरव्हील क्लब तर्फे हात व पाय मोफत देण्यात येणार आहे. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, खजिनदार सोनाली खोजुवेकर, सौ शितल केसरकर तसेच सदस्य डॉ. अमृता स्वार, डॉ. शुभदा करमळकर, पूजा पोकळे, रिया रेडीज, श्रेया नाईक, अनिता भाट, मृणाली कशाळीकर, अँड सायली दुभाषी आदी उपस्थित होते, या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.