डीबीजे महाविद्यालयात स्पंदन युवा मनाचे २०२३- २४

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील डीबीजे महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ‘स्पंदन युवा मनाचे २०२३-२४’ अंतर्गत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणाना प्रोत्साहन मिळावे म्हणून कॉलेजमध्ये नेहमीच सहशैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमात सहभागी व्हावे असे अवाहन प्राचार्य डॉ. माधव बापट, स्नेहसंमेलन समितीचे प्रमुख माधव ओक व सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले आहे.

दिनांक २० डिसेंबर रोजी गृप सेमिलारेटी डे, फ्रेंडिशिप डे व चौकलेट डे साजरे होणार आसून उद्घाटन समारंभाला न.ए.सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ.माधव बापट व स्नेहसंमेलन समितीचे प्रमुख माधव ओक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि. २१ डिसेंबर रोजी ट्रॅडिशनल डे, टरबन डे, एनसीसी मार्च पास, ग्रंथ दिंडी व याच दिवशी सकाळी १०:३० वाजता एनएसएस आणि एनसीसी विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता तिसरी घंटा हे नाटक सादर होणार आहे. दि. २२ डिसेंबर रोजी बॉलीवूड डे, बलून डे व सकाळी १० वाजता सांस्कृतिक विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार असून यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता निशिकांत कानिटकर (अभिनेता,दिग्दर्शक, कवी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला असून यावेळी विवेक सोहनी (प्रबंधक Broadest & operation of follow chess) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व व्हाईट कॉन्ट्रॅस्ट डे, मिसमॅच डे, गॉगल डे व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला असून यावेळी कौशल इनामदार (प्रसिद्ध संगीतकार व गायक) आणि सौ.शमा चक्रवर्ती (वित्त व्यवस्थापक कॉर्णीग इनकॉर्पोरेटेड) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व सारी डे, टाय डे, दांडिया नृत्य, संगीत खुर्ची व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे.