मंडणगड नगरपंचायतीमधील प्रशासकीय अभिलेखात खाडाखोड

पदमुक्त कर्मचाऱ्याचा कारभार; कारवाईकडे शहराचे लक्ष

मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायतीचे कामातून पदमुक्त झालेल्या एका कर्मचाऱ्याने नगरपंचायतीचे प्रशासकीय कारभारातील अभिलेखात विशेषता बांधकाम मोजमाप वहीवर (एम.बी.) खाडाखोड करुन गैरप्रकार केल्याचा माहीती विश्वसनीय सुत्रांकडून पत्रकारांना प्राप्त झाली आहे.

मंडणगड नगरपंचायतीचे आर्थीक दिवाळखोरीच्या विरोधकांच्या आरोपांचे पार्श्वभुमीवर नगरपंचायतीचे प्रशासकीय कारभारातील सावळ्या गोधळांचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या विषयांची सर्व संबंधीतांना आंर्तगत गुप्त माहीती असली तरी यांची जाहीर वाच्छता अद्याप कोणीही सार्वजनीक केलेली नाही. प्रशासकीय कारभारातही सगळे काही आलबेल नसल्याचा पुरावा या निमीत्ताने सगळ्याना मिळालेला आहे. या संदर्भात विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार गेले अनेक दिवस नगरपंचायतीचे एका कामाचे देयक देण्यास विलंब संबंधीत विभागाकडून होत होता. त्यामुळे त्यांनी या संदर्भात अधिकची माहीती घेतली असता कामासंदर्भात रेकॉर्डीग झालेले देयकाची एम.बी. घेऊन पदमुक्त झालेले असतानाही या कर्मचाऱ्याने त्यावर खाडाखोड करुन एम.बी.वर पूर्वीची आकडेवारी रद्द असे लिहून ते मिटवण्याची प्रकार केला आहे. हा प्रकार फारच गंभीर असल्याने कार्यमुक्त कर्मचाऱ्याचे विरोधात सर्व ठिकाणी तक्रार होणाऱ असल्याची माहीती पत्रकारांना मिळाल्याने या विषया संदर्भात मंडणगड नगरपंचायतीचा अतिरक्त कार्यभार असलेले मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे यांच्याकडे पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी मी या प्रकरणाची अधिकची सखोल माहीती घेऊन आपणास कळवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.