माखजन |वार्ताहर :संगमेश्वर तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील कसबा येथे झाले.या विज्ञान प्रदर्शनात माखजन इंग्लिश स्कूल येथील प्रयोग शाळा सहाय्याक सचिन साठे यांना प्रथम क्रमांक मिळाला.
सचिन साठे यांनी ५ वी ते १० वी पर्यंत चे बहुतांश प्रयोग एकाच मॉडेल मधून मांडले.सचिन साठे यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याने परिसरातून अभिनंदन होत आहे.यापूर्वीही सचिन साठे यांनी अनेकदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम येत आपल्या मॉडेल चे सादरीकरण जिल्ह्याला केले आहे.व त्याठिकाणी आपला क्रमांक पटकवला आहे.त्यांच्या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर, संस्था अध्यक्ष आनंद साठे,उपाध्यक्ष मनोज शिंदे व अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.












